पर्यावरण पूरक गणपती कार्यशाळा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघ नगरातील विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा येथे पर्यावरण पूरक गणपती गणेशमूर्ती तयार करण्याची आज (दि.२ सप्टेंबर) रोजी कार्यशाळाचे आयोजित करण्यात आले होते. 

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयिका वैशाली पाटील, कलाशिक्षक मच्छिंद्र भोई, सचिन गायकवाड व भाग्यश्री वारुडकर उपस्थित होते.

गणपती हे आराध्यदैवत म्हणून ओळखले जाते.भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. या गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन विवेकानंद प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेत गणेश उत्सव मधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणार आहे. यासाठी पर्यावरण  पूरक गणपती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती.

कलाशिक्षक मच्छिंद्र भोई यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणपती कसा तयार करावा? याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व सोबतच माहिती सुद्धा सांगितली. त्यांच्याबरोबर 100 विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत शाडूमतीचे सुमारे 123 गणपती तयार केले व त्याची स्थापना ती स्वतःच्या घरात, स्वतःच्या घरी करणार आहेत. विद्यार्थ्यांसोबत कार्यशाळेत त्यांचे मोठे भाऊ, बहीण, आई ,आजी, बाबा, उपस्थित होते. विद्यार्थ्यां स्वतः गणपती साकार करताना पालकांचा उत्साह हा प्रभावी होता. पालकवर्ग खूप आनंदी व समाधानी होते.

शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले गणेशउत्सवाचा खरा उद्देश सफल करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे म्हणूनच आपण या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तसेच गणेशाचे व पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी आपलीच आहे असे सांगत समन्वयिका सौ वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांचे शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती बनवल्या बद्दल कौतुक केले.

या कार्यशाळेला मुख्याध्यापक पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.  पर्यावरण पूरक गणपती गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळेचे संपूर्ण  नियोजन सचिन गायकवाड,  वैशाली पाटील, भाग्यश्री वरुडकर यांनी केले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर यांचे सहकार्य लाभले

 

Protected Content