दिलासादायक ! जिल्ह्यात दिवसभरात ६४६ रूग्ण झाले बरे; १५३ रूग्ण नव्याने आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या आजच्या कोरोना अहवालात दिवसभरातून ६४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज १५३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव शहरातील एका कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

 

तालुकानिहाय आकडेवारी 

जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-१४, अमळनेर-१३, चोपडा-२०, पाचोरा-२, भडगाव-२, धरणगाव-१९, यावल-०, एरंडोल-१४, जामनेर-८, रावेर-०, पारोळा-१, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-२०, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १५३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ५० हजार ३३८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले त्यापैकी १ लाख ४५ हजार १७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. सध्या २ हजार ५७३ कोरोना बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज एका बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकुण २ हजार ५८६ रूग्णाचा उपचारादरम्या मृत्यू झाला आहे. अशी माहिती आज दिलेल्या प्रसिध्दीपत्रान्वये दिले आहे.

Protected Content