महामार्गावर कारचा अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  समृध्दी महामार्गावर भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील तांदलवाडी शिवारात घडली आहे.

याबाबत सविस्तर असे की, समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच आता समृद्धी महामार्गावरून वाहतूक सुरू असल्याने अपघात होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी मेहकर येथील काही व्यावसायिक औरंगाबाद येथून समृद्धी महामार्गाने मेहकरकडे येताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने तांदुळवाडी शिवारात भरधाव कारवरील चालकाच नियंत्रण सुटले. यात भरधाव कार महामार्गावरील डिव्हाईडरच्या खड्ड्यात पलटून अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कार ने तीन ते चार वेळा पलटी घेऊन खड्डयात अडकली. या अपघातात मेहकर येथील व्यावसायिक बळीराम खोकले हे जागीच ठार झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूकीचा खोळंबा झाला होता.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!