धरणगाव तालुक्यातून २० वर्षीय तरूणी कॉलेजला जात असल्याचे सांगून बेपत्ता !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरूणी ही कॉलेजला जात असल्याचे सांगून शुक्रवार २९ मार्च रोजी सकाळी ७ वाजेपासून घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी शनिवारी ३० मार्च रोजी दुपारी दीड वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरूणी  ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता ती कॉलेजला जात असल्याचे भावाला सांगून घरातून निघून गेली. त्यानंतर ती घरी आली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतू तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी ३० मार्च रोजी दुपारी दीड वाजता तिच्या पालकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नेांद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार खुशाल पाटील हे करीत आहे.

Protected Content