भुसावळात अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात एका ४५ वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवार ३० मार्च रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका परिसरात शनिवारी ३० मार्च रोजी सकाळी एका ४५ वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ तेजस पारीस्कर हे करीत आहे.

Protected Content