घरातून रोकड व मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्याला अटक; वरणगाव पोलीसांची कामगिरी !

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील गांधी चौकात राहणाऱ्या एकाच्या घरातून दीड हजार रुपयांची रोकड आणि एक हजार रुपये किमतीचा मोबाईल असा अडीच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या संशयित आरोपी विशाल उर्फ गोलू माळी रा. भवानीनगर, वरणगाव) याला वरणगाव पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अधारे वरणगाव शहरातून अटक केली आहे.

याबाबत अधिक असे की, बंडू संपत चौधरी ( वय-५४, रा. गांधी चौक वरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २९ मार्च रोजी मध्यरात्री झोपलेले असताना मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घरात ठेवलेले दीड हजार रुपयांची रोकड आणि एक हजार रुपये किमतीचा मोबाईल असा अडीच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चौकशीला सुरूवात करण्यात आली. दरमयान ही चोरी संशयित आरोपी विशाल उर्फ गोलू माळी यांचे केल्याच निष्पन्न झाले. पोलीसांनी शनिवार ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता कारवाई करत त्याला वरणगाव शहरातील भवानी नगरातून अटक केली आहे. त्यांच्याजवळू चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तपास सहाय्यक फौजदार नाग्रेंद्र तायडे करीत आहे.

ही कारवाई मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल अतुल बोदडे, पराग दुसाने, सुकराम सावकारे, ईश्वर तायडे यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content