भुसावळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक

भुसावळ प्रतिनिधी । बेकायदेशीर दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यावर बाजारपेठ पोलीसांनी कारवाई करून ताब्यातील साडे चौदा हजार रूपये किंमतीची देशी विदेशी दारू हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील नाहटा चौफुली वरून जामनेर रोड वरून जाणाऱ्या संशयित आरोपी शितल साहेबराव पाटील (वय-३२) रा. बजरंग पुरा जामनेर हा बेकायदेशीर देशी विदेशी दारूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सपोनि अनिल मोरे, पो.ना.रविंद्र बिऱ्हाडे, रमन बिऱ्हाडे, उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, तुषार पाटील, महेश चौधरी, प्रशांत परदेशी यांनी शनिवारी ६ जुन रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शितल पाटील हा दुचाकी क्रमांक (एमएच २० जेसी २५५६) हा जात असतांना अडवून त्याची कसून चौकशी केली असता १४ हजार ४०० रूपये किंमतीचे देशी विदेशी दारूची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.ना.समाधान पाटील करीत आहे.

Protected Content