गांजा तस्करी प्रकरणी एनसीबीची छापेमारी : एक अटकेत

जळगाव प्रतिनिधी | गांजा तस्करीत सहभागी असल्याच्या संशयातून मध्यप्रदेश एनसीबीच्या पथकाने धरणगाव येथून एकाला अटक केली आहे.

मध्य प्रदेश एनसीबीच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री धरणगावातून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. इंदूर येथील गांजा तस्करीच्या गुन्ह्यात ही अटक झाल्यने खळबख उडाली आहे.

इंदूर येथे जुलै महिन्यात गांजा तस्करीचा गुन्हा दाखल झाला होता. या गांजा तस्करीचे कनेक्शन एरंडोल-कासोदा भागात असल्याची माहिती मध्य प्रदेश एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार काही दिवसांपासून मध्य प्रदेश एनसीबीचे अधिकारी-कर्मचारी एरंडोल भागात लक्ष ठेवून होते. याच गुन्ह्यातील संशयित विजय किसन मोहिते (रा.सरस्वती कॉलनी, एरंडोल, ह.मु.धरणगाव) याला पथकाने ताब्यात घेतले. मध्य प्रदेश एनसीबीच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री सापळा रचून ही कारवाई केली. एनसीबीच्या पथकात दोन अधिकारी व एका कर्मचार्‍याचा समावेश होता. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

Protected Content