जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनोळखी वृध्दाचा मृत्यू

ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनोळखी वृध्द व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हापेठ पोलीसांनी सोमवारी ३० मे रोजी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नवीन बसस्थानक परिसरात अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी वयोवृध्द २१ मे रोजी अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला होता. त्याला खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी २८ मे रोजी रात्री अनोळखी वयोवृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, पोलीसांनी धाव घेतली असता वयोवृध्दाची ओळख पटविण्यासाठी कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान, मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हापेठ पोलीसांनी सोमवारी ३० मे रोजी सकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. याचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!