महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांसह ४३ कर्मचारी होणार सेवानिवृत्त

जळगाव- -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापालिकेतील शहर अभियंता, पाणीपुरवठा उपअभियंता व अतिक्रमण अधीक्षक या प्रमुख अधिकाऱ्यांसह ४३ कर्मचारी आज सेवानिवृत्त होत आहेत.

 

महापालिकेतील ४३ कर्मचारी आज विहित वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त होत आहेत. यात शहर अभियंता व्ही. ओ. सोनवणी, अतिक्रमण अधीक्षक इस्माईल शेख, पाणीपुरवठा उपअभियंता गोपाल  लुल्हे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रभाग क्र. २ चे प्रभाग अधिकारी उदय पाटील यांची शहर अभियंता किंवा प्रभाग क्र. १ चे प्रभाग अधिकारी म्हणून वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बांधकाम अभियंता संजय नेमाडे यांना पाणीपुरवठा उप अभियंतापदी नियुक्त मिळू शकते. आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक संजय अत्तरदे, शरद बडगुजर व स्वच्छता निरीक्षक काशिनाथ बडगुजर हे देखील सेवानिवृत्त होत आहेत. दरम्यान, प्रभाग क्र.२ चे अधिकारी उदय पाटील यांच्याकडे नुकतीच ग. स. सोसायटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आलेली असल्याने त्यांना शहर अभियंतापदी नियुक्त न देता प्रभाग क्र. १ चे अधिकारी म्हणून नियुक्त देण्यात येणार असल्याची शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अभियंता संजय पाटील यांची शहर अभियंतापदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवीन अधिकाऱ्यांना २ जूनपासून पदभार सोपविण्यात येऊ शकतो. आज सेवानिवृतांमध्ये आयुक्त यांचे वाहन चालक कांतिलाल विठ्ठल पाटील, नानाभाऊ काळे आदींचा समावेश आहे.

Protected Content