जळगावातील ऑटोजेम्स या कंपनीत १५ लाखांचा अपहार; एकास अटक

जळगाव प्रतिनिधी । मारुती सुझुकी या कंपनीस स्पेअर पार्ट पुरवणाऱ्या जळगावातील ऑटोजेम्स या कंपनीत १५ लाख १८ हजार ७२३ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी शाखा प्रमुखास अटक केली आहे.

शाखा प्रमुख संदीप अजित सोनार (वय४०, रा. सागर नगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. कंपनीचे नाशिक येथील व्यवस्थापक मनोज जिजाबरव देशमुख यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. कंपनीचे सुरेश दादा जैन कॉम्प्लेक्स येथे कार्यालय आहे. संदीप सोनार हा तेथे शाखा प्रमुख म्हणून पाच वर्षांपासून काम पाहतो आहे. दरम्यान, संदीप याने एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या काळात कंपनीच्या बँक खात्यातून १७ लाख रुपयांचा अपहार केला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला ताकीद देण्यात आली. आपल्यावर कर्ज झाल्यामुळे अपहार केल्याचे संदीपने कबूल केले. पैसे परत करण्यासाठी त्याने मुदत मागितली होती. त्यामुळे कंपनीने कारवाई केली नाही. संदीप याने ३ धनादेश दिले होते, पैकी २ लाखांचा एक धनादेश वटला. उर्वरित रक्कम परत करण्यासाठी त्याने टाळाटाळ केली. अखेर व्ययस्थापक देशमुख यांनी गुरुवारी संदिपच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संदीप याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवने तपास करीत आहेत.

Protected Content