‘त्या’ अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू; कुसुंबा गावात शोककळा

जळगाव प्रतिनिधी । भरधाव आयशरने पल्सर दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी दादावाडीजवळ घडली होती. यातील जखमी पतीचे आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून कुंसंबा गावात शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अजबसिंग उदयसिंग पाटील (वय-३६) व पत्नी कविता अजबसिंग पाटील (वय-३०) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव हे आपल्या (एमएच १९ बीडी-४८९) क्रमांकाच्या दुचाकीने रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगावकडून एरंडोल तालुक्यातील खेडी येथे नातेवाईकांकडे लाग्नासाठी जात होते. सोबत त्यांचा मुलगा दर्शन पाटील आणि साडूचा मुलगा सौरभ महाले होते. राष्ट्रीय महामार्गावर दादावाडी ते खोटे नगर रिक्षा स्टॉपच्या दरम्यान तिरूपती ट्रेडर्ससमोर पाळधीकडून येणार्‍या (एमएच १९ बीजी ८१८०) क्रमांकाच्या आयशरने या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अजबसिंग उदयसिंग पाटील यांच्या हाताला तर सोबत असलेल्या कविता पाटील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या सोबत असणार्‍या दोन मुलांना मात्र सुदैवाने काही लागले नाही. दरम्यान, संबंधीत आयशर चालकाने दुचाकीला उडविल्यानंतर तो घटनास्थळी न थांबता फरार झाला. त्याला नशिराबाद येथे अटक करण्यात आली होती.

गावात शोककळा
जखमी पती-पत्नी यांना शहरातील नामवंत खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास पती अजबसिंग पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुपारी शवविच्छेदन करण्यात आले असून कुसुंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content