समता नगरातील चॉपर हल्लाप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून समता नगरात तीन जणांवर पाच जणांनी चॉपरने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी सोमवारी विक्की अरुण शिंदे या तरूणाच्या फिर्यादीवरून अक्षय विजय बारी, सोनू उर्फ कुलदीप अढाळे, पप्पु अढाळे, नीलेश सुरळके, अमर सोनवणे यांच्याविरूध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे हे प्रकरण
जखमींनी दिलेली माहिती अशी, समता नगरात अरूण सोनवणे, गोकुळ सोनवणे व कैलास सोनवणे हे तिघे तरूण वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री चार ते पाच तरूण ही अरूणच्या घरी आली. आणि त्यांनी ‘तु ट्रॅक्टरवरील काम का सोडले’ असा जाब विचारत अचानक तलवारने वार केला. त्यानंतर त्यांनी लागलीच जवळच राहत असलेले गोकूळ आणि कैलास यांच्याकडे जावून त्यांच्यावरही हल्ला केला. तलवार हल्लयात तिघांच्या हाताला तसेच छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाली़ हल्ला केल्यानंतर ती तरूण मंडळी तेथून पसार झाले.

जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात घेतली धाव
जखमी तिघं तरूणांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी त्यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. परंतु, पोलीस तक्रार घेत नाही, म्हणून जखमींसह त्यांच्या नातेवाईकांनी चक्क रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे आपला मोर्चा वळविला. नंतर कारवाई व्हावी म्हणून पोलीस अधीक्षक आवारात ठिय्या मांडला. त्यावेळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांनी त्याठिकाणी येवून जखमी व त्यांच्या नातेवाईकांची समजूत घातली व त्यानंतर जखमींना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात पाठविले. तिन्ही जखमींच्या हात तसेच डोक्यातून रक्तस्त्राव होत होता.

Protected Content