गरुड महाविद्यालयातील प्राध्यापक , कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी

 

 

शेंदुर्णी: प्रतिनिधी । अप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांची जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अभियाना अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांच्या सहकाऱ्यांनी कोविड-19 तपासणी केली

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्या आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी यांच्या सहकार्याने कोविड-19 तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले , या शिबिरात 20 प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी “आरटि पीसीआर” टेस्ट तपासणी नमुने दिलेत.
या कोविड-19 तपासणी शिबिराकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, फार्मासिस्ट डी. एम. मुर्तडकर, आरोग्य सहाय्यीका आर. सी. पाटील, आरोग्य सहाय्यक गजानन माळी, किशोर कांबळे, ईश्वर कोळी, प्रकाश बारी, श्रीमती सविता कुमावत, घाटे सिस्टर, यांनी सहकार्य केले

महाविद्यालयाच्या वतीने चेअरमन संजयराव गरुड, सतीश काशिद, प्राचार्य डॉ. वासुदेव र. पाटील, उपप्राचार्य डॉ. संजय भोळे, उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, अधीक्षक सतीश बाविस्कर, मुख्य लिपिक हितेंद्र गरुड आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले शिबिर आयोजन सहकार्याबद्दल महाविद्यालयाने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले

Protected Content