जळगावात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात कामधंद्यासाठी जळगावात आलेल्या तरूणाने दारूच्या नशेत मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, भिम मुन्ना राठोड (वय-३०) रा. उमऱ्या ता.शिरपूर जि.धुळे हे गेल्या दीड महिन्यापासून कामधंद्याच्यानिमित्ताने जळगावातील ढोर बाजार परिसरात सासऱ्यांच्या घरी आले होते. जळगाव दीड महिन्यांपासून बांधकाम मिस्तरीचे काम करत होते. कौटुंबिक वाद झाल्याने त्यांनी संतापाच्या भरात मध्यरात्री घराबाहेर असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या केल्याचे सासुच्या लक्षात आल्याने उघडकीस आले. मयताच्या पश्चात पत्नी सविता, दोन मुली आणि चार वर्षाची मुलगी असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पो.ना. संतोष पाटील करीत आहे.

Protected Content