Home Cities जळगाव जळगावात काँग्रेस आक्रमक ; प्रभाग ७ ते ११ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांशी...

जळगावात काँग्रेस आक्रमक ; प्रभाग ७ ते ११ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांशी चर्चा, १५ दिवसांत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन

0
7


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाढत्या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज महापालिकेत धडक मारत महापौर सौ. दीपमाला काळे यांच्याशी सकारात्मक व सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील प्रभाग क्रमांक ७, ८, ९, १० आणि ११ मधील कचरियाचे साम्राज्य, बंद असलेले पथदिवे, मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास आणि आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांकडे काँग्रेस शिष्टमंडळाने महापौरांचे गांभीर्याने लक्ष वेधले.

शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जमील शेख आणि ब्लॉक अध्यक्ष अनंत परिहार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर दालनात महापौर सौ. दीपमाला काळे यांच्यासह महापालिकेचे विद्युत अभियंता मोरे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. शहरातील बहुतांश भागांत कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली. तसेच प्रभागांमधील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असून, मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटामुळे लहान मुले व वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण आहे, यावर तातडीने उपाययोजना करण्याची आक्रमक मागणी करण्यात आली.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत महापौर सौ. दीपमाला काळे यांनी संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने कक्षात बोलावून आवश्यक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच प्रभाग ७ ते ११ मधील या सर्व प्रलंबित समस्या पुढील ८ ते १५ दिवसांत प्राधान्याने मार्गी लावल्या जातील, असे ठोस आश्वासन काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीस शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख, उपाध्यक्ष जगदीश गाढे, ब्लॉक अध्यक्ष अनंत परिहार, राहुल भालेराव, विशाल पवार, सरचिटणीस अमजद पठाण, मालोजीराव पाटील, कफिल अहमद, अरुणाताई पाटील, अनिता कोळी यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound