Home क्रीडा किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलचे यश ; दुर्वेश पाटील अन् यतीश कुंभार यांची...

किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलचे यश ; दुर्वेश पाटील अन् यतीश कुंभार यांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

0
7


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धांमध्ये किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. फैजपूर येथील श्री धनाजी नाना महाविद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत शाळेच्या दुर्वेश दिगंबर पाटील आणि यतीश दिपक कुंभार यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांच्या या यशामुळे शाळा व परिसरभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डोणगाव किनगाव रोडवरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या इयत्ता ८ वी मधील विद्यार्थी दुर्वेश दिगंबर पाटील आणि इयत्ता ७ वी मधील विद्यार्थी यतीश दिपक कुंभार यांनी या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. सध्या सुरू असलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धांतर्गत १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवला आहे. यात फैजपूर येथे आयोजित कॅरम स्पर्धेत दुर्वेश आणि यतीश या दोघांनीही प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत दणदणीत विजय मिळवला व जिल्हास्तरीय स्पर्धेत धडक मारली.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा श्री संत तुकाराम महाराज सेवाभावी संस्था पंढरपूरचे अध्यक्ष विजयकुमार देवचंद पाटील, संस्थेचे सचिव तथा संजीवन हॉस्पिटल पुणेचे संचालक मनीष विजयकुमार पाटील, स्व. केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका सौ. पूनम मनीष पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन्ही विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound