कालिंकामाता मंदीराजवळ कारची मालवाहू रिक्षाला धडक; रिक्षाचालक जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कालिंकामाता मंदीराजवळ मालवाहू रिक्षाला भरधाव कारने धडक दिल्याने रिक्षाचालक जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली असून कारचालकाविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रामेश्‍वर कॉलनी येथील  महेश पंढरीनाथ कोळी (वय २३ रा रामेश्‍वर कॉलनी, मेहरुण)  हे पाण्याचे जार वाहून नेण्याच्या मालवाहू रिक्षावर चालक आहेत. आज सोमवारी सकाळी महेश कोळी नेहमीप्रमाणे मालवाहू रिक्षा क्रमांक (एम.एच.१९ सी.वाय. ६३७१) ने पाण्याचे जार पोहचविण्यासाठी जळगाव भुसावळ रोडने कालिंका माता मंदिर पसिरातून जात होते. यादरम्यान कालिंकामाता मंदिराजवळ (एम.एच.१९ सी.बी.०५०१) या क्रमांकाच्या कारने मालवाहू रिक्षास मागून जोरदार धडक दिली. कारच धडकेन रिक्षा समोरील वाहनावर धडकली. यात रिक्षाचा समोरील काच फुटला असून नुकसान झाले आहे. तर चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे.  तर जोरदार धडकेने कारमधील एअरबॅग उघडली होती. कारचेही समोरील भागाचे या नुकसान झाले आहे. अपघातानंतर रिक्षाचालक महेश कोळी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन कारचालक रोहित संजय पालक रा. विठ्ठलपेठ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहेत.

Protected Content