नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून अधिकाअधिक उपक्रम राबवावे!

 

ळगाव, प्रतिनिधी । भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राला योग्य ते सहकार्य करून युवा स्वयंसेवकांच्या मदतीने जिल्ह्यात अधिकाअधिक चांगले उपक्रम राबवावे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्त अनिसा तडवी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी उल्हास कोल्हे, एनसीसीचे हेमा राम, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी विजयसिंग पवार, जिल्हा आरोग्य विभाग जिल्हा परिषदेचे डॉ.मनोहर बावणे, लीड बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, एनएसएसचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून बँक मित्र तयार करण्यासाठी लवकरात लवकर पुढाकार घ्यावा जेणेकरून त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करता येईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तयार करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक करताना नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. केंद्र शासनाकडून चालू वर्षासाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमाची माहिती देत आत्मनिर्भर भारत, युवक संघटन, ग्रामीण भागात जनजागृती, महिला सबलीकरण, बँक मित्र, कोरोनाविषयी जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन पथक तयार करणे, फिट इंडिया अभियान, युवक प्रशिक्षण, तालुका क्रीडा स्पर्धा, जिल्हा क्रीडा स्पर्धा, ग्रामीण संस्कृतीचा जागर, स्वच्छ गाव, हिरवे गाव, महात्मा गांधी जन्म शताब्दी महोत्सव, स्वच्छता श्रमदान, स्वच्छता पखवाडा, जलजागरण प्रशिक्षण, युवा संस्थांना प्रोत्साहन पुरस्कार देणे असे उपक्रम असल्याचे डागर यांनी सांगितले.

बैठकीला नेहरू युवा केंद्राचे लेखालिपिक अजिंक्य गवळी, युवक प्रतिनिधी चेतन वाणी, स्वयंसेवक आकाश धनगर, रणजीतसिंग राजपूत, भूषण लाडवंजारी, नितीन नेरकर, प्रशांत बाविस्कर, मोतीलाल पारधी आदी उपस्थित होते.

Protected Content