तरूणीची बनावट इन्स्टाग्राम खात्यावरून बदनामी; सायबरला गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात राहणारी २१ वर्षीय तरूणाच्या नावाचा व फोटोचा वापर करीत बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करुन तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे.  सायबर पोलिस ठाण्यात बनावट खाते तयार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात २१ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्यालआ हो.  तरूणीच्या नावाचा व फोटोचा वापर करीत बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करण्यात आल्याचे बुधवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता लक्षात आले. या खात्यावर तरुणीचा बदनामीकारक मेसेज तसेच अश्लिल प्रकारचे स्टिकर लावून तिचे फोटो इन्स्टाग्रामच्या स्टोरीला ठेवण्यात आले. यातून तिची सोशल मीडियावर बदनामी करीत हे फोटो व्हायरल करण्यात आले.  याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content