दुचाकीवरून घसरून पडल्याने परप्रांतीय तरूणाचा मृत्यू

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील घाट रोडवर दुचाकीवरून घसरून पडल्याने २५ वर्षीय परप्रांतीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. पेरीयास्वामी कार्तीकेयन गोंडर वय २५ रा. करूर राज्य तामिळनाडू असे मयत झालेल्या परप्रांतीय तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, चाळीसगाव शहरातील घाट रोड परिसरातून पेरीयास्वामी कार्तीकेयन गोंडर वय २५ रा. करूर राज्य तामिळनाडू आपल्या दुचाकीने जात असतांना अचानक त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीवरून घसरून पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांचे सहकारी नंदकुमार कुप्पुस्वामी यांनी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सुभाष घोडेस्वार हे करीत आहे.

Protected Content