आई-बाबांचे पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातर्फे गुरुपौर्णिमा अतिशय उत्साहात, आपले प्रथम गुरु आई-वडील, आजी आजोबा यांचे पूजन करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील आपले पहिले गुरू म्हणजेच आई-वडील यांचे सकाळी पूजन, औक्षण करून त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. ज्या विद्यार्थ्यांच्या घरी आजी-आजोबा आहेत, त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनाही त्यांच्या आई-वडिलांचे पूजन,औक्षण करायला सांगितले आणि आशीर्वाद घ्यायला सांगितले. गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना शिक्षकांनी व्हाट्सअप वर काही गुरु शिष्य जोड्या पाठवून त्यांच्यासंबंधी गोष्ट किंवा प्रसंग लिहायला सांगितले. तसेच ऑडिओ रेकॉर्ड केलेली माहिती, गीत, भजन, गोष्ट विद्यार्थ्यांना व्हाट्सअप वर पाठवण्यात आली. गुरुपौर्णिमेची माहिती मनीषा पाटील, गोष्ट योगिता राणे यांनी सांगितली तर गीत आणि भजन पूनम दहिभाते, योगेश जोशी यांनी म्हटले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

https://www.facebook.com/watch/?v=899384967247139

 

Protected Content