मागील २४ तासांत राज्यात तब्बल ३० पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) मागील २४ तासांत राज्यातील तब्बल ३० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४ पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

महाराष्ट्र पोलिस दलात आतापर्यंत एकूण ५२०२ पोलिसांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ४०७१ पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या १०७० पोलिसांवर उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एक अधिकारी आणि तीन पोलिस कॉन्स्टेबलचा समावेश आहे. सध्या मुंबईत ११४ पोलिस अधिकारी आणि ९५६ पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. तर आतापर्यंत राज्यात ६८ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या २०००६४ वर पोहचली असून त्यातील १०८०८२ रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. तर ८३२९५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यात कोरोना संसर्गामुळे एकूण ८६७१ रुग्णांचा बळी गेला आहे.

Protected Content