मंडळ अधिकाऱ्यांच्या तत्काळ नियुक्ती करा, अन्यथा आंदोलन ; धरणगाव भाजपचा इशारा (व्हीडीओ)

58f0b14d 0fd8 4407 8e7a 392c9da65c94

 

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील काही ठिकाणी मागील 45 ते 50 दिवसापासून मंडळ अधिकारी नाहीत. त्यामुळे शेतकरी,सर्वसामन्यांचे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयातील कोणतेच काम होत नाहीय. यासंदर्भात आज धरणगाव भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 

तालुक्यातील काही ठिकाणी मागील 45 ते 50 दिवसापासून मंडळ अधिकारी नाहीत. त्यामुळे लोकांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत आहे. धरणगाव शहर भारतीय जनता पार्टीने तहसील कार्यालयात जाऊन या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे व्हावी, याबाबत आज निवेदन देण्यासाठी पोहचले. परंतू तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यापैकी कोणीही कार्यालयात उपलब्ध नव्हते. तेव्हा मग पालिका गटनेते कैलास माळी सर यांनी दूरध्वनीवरून तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला. त्यावर दोन दिवसात अधिकारी नेमण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले आहे. तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष कांतीलाल माळी यांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांचे पी. ए. दीपक तायडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा दोन दिवसात अधिकारी नेमण्यात येतील, असे आश्वासन दिले.

 

निवेदन देतांना पालिका गटनेते कैलास माळी, शहर अध्यक्ष सुनील वाणी, सरचिटणीस सुनील चौधरी, उपाध्यक्ष आर. डी. महाजन , युवा मोर्चा अध्यक्ष कांतीलाल माळी, पुनीलाल महाजन, कडूसिंग बयस, हितेश पटेल, सचिन पाटील, संतोष सोनवणे, शरद भोई, योगेश महाजन, इच्छेश काबरा तसेच मोठया प्रमाणावर कार्यकर्ते व पदाधिकारी उपास्थित होते.

 

Protected Content