उमरदे येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

ee475f4e c2bd 491a a626 56ccb7d4829d

 

एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील उमरदे येथील एका व्यक्तीचा विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास एरंडोल शिवारातील निखिल पेट्रोल पंपाजवळ निंबा भिवसन पाटील (वय ४८) यांना शमीम बी शे.शमशेर यांच्या शेतातील पोल्ट्री फार्म जवळील पाण्याच्या खोलीत इलेक्ट्रीक मोटारीचा शॉक लागला .त्यात ते जागीच मयत झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनिल लोहार हे करीत आहेत. मयत निंबा पाटील यांच्यावर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

Protected Content