गर्भपात शस्त्रक्रीयेनंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू ; जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा संताप

suside

 

जळगाव (प्रतिनिधी) गर्भपात शस्त्रक्रीया केल्यानंतर अवघ्या दोन दिवसात महिलेची प्रकृती खालावत मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) सकाळी जिल्हा रुग्णालयात घडली. डॉक्टरांवर हलगर्जीपणा आरोप करत गुन्हा करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे काही वेळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

या संदर्भात अधिक असे की, शिलाबाई पदमसिंग राजपूत (वय ३३, रा.पळासखेडा, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) या गर्भवती असल्यामुळे शनिवारी (२० जूलै) रोजी त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांचा गर्भपात करत शस्त्रक्रीया करण्यात आली. परंतू शस्त्रक्रीया व गर्भपातावेळी जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यानंतर उपचार सुरू असताना त्यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकची खालावली. त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावे, यासाठी रविवारी रात्री कुटंुबीयांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.नखाते यांना बोलावण्याची मागणी केली. अनेक वेळा त्यांना फोन केले. परंतू, ते आले नाहीत.

 

दरम्यान, आज (सोमवार) सकाळी १०.३० वाजता शिलाबाई यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही वेळ रुग्णालयात तणावाचे निर्माण झाला होता.

Protected Content