संतापजनक : घरातून पळालेल्या अल्पवयीन मुलीवर २२ दिवस सामूहिक बलात्कार

कटक वृत्तसंस्था । आईवडिलांशी भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात घर सोडून बाहेर पडलेल्या १७ वर्षीय मुलीवर २२ दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 

दिलेल्या सुत्रांनी कळविले आहे की, घरी नेऊन सोडतो म्हणत आरोपीने बस स्थानकासमोरून मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर शेतातील घरात डांबूर ठेवत तिच्यावर २२ दिवस सामूहिक अत्याचार करण्यात आला. ओडिशातील कटकमध्ये क्रूर घटना घडली आहे. देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना चर्चेत असतानाच ओडिशातील कटकमध्ये आणखी एक सामूहिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे.

Protected Content