खंडेराव नगरात जुगाराच्या अड्ड्यावर पोलीसांची धाड; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगर भागात सट्टा जुगाराच्या अड्डयावर मंगळवारी रात्री रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत दहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून सट्टा जुगाराचे साहित्य आणि ४७३० रुपये हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना खंडेराव नगरात सट्टा जुगारांचा अ×ड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी, उपनिरीक्षक देशमुख, प्रवीण जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल अजय सपकाळे आदींनी मंगळवारी रात्री खंडेराव नगरात जुगाराच्या अड्डयावर छापा टाकून कारवाई केली. घटनास्थळी सट्टा जुगार खेळतांना मिळून आलेल्या योगेश दौलत महाजन (३६) हरीविठ्ठलनगर जळगाव, संतोष विटट्ल भोई (३८) रा. हरीविट्टनगर जळगाव, मुकेश चरणदास राठोड (३०) रा.हरीविठ्ठलनगर जळगाव, अशोक रामदास सोनार (६३) रा हरीविठ्ठनगर जळगाव, शंकर वेडु भोई रा.हरीविठ्ठलनगर जळगाव, शिवा राजधर मिस्तरी (४५)रा. हरीविठ्ठनगर जळगाव, गणेश गुरुमुख पवार (३५) रा. हरीविठ्ठनगर जळगाव, रमेश पुंडलिक जगताप (५३) रा. हरीविठ्ठनगर जळगाव, धनराज सिताराम पाटील (६७) रा.खंडेराव नगर शिंपीगल्ली जळगाव, रविंद्र अमृत बोरसे (४२)रा हरीविठ्ठनगर स्टॉपजवळ जळगाव या दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कैलास बुधा हटकर रा. हरीविठ्ठलगर यांच्या सांगण्यावरुन हा जुगार सुरु असल्याची माहिती चौकशीत ताब्यात घेतलेल्या संशयितांनी दिली असून कैलास हटकर सध्या फरार आहे. याप्रकरणी पो.कॉ.अजय सपकाळे यांच्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content