आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीचे १९ प्रस्ताव मंजूर

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी l  – जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेल्या २७ आत्महत्याग्रस्त शेतकरी  कुटुंबीयांच्या मदत प्रस्तावांपैकी १९ प्रस्तावाना मंजुरी देण्यात आली. तर ८ प्रस्ताव फेटाळण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी आत्महत्या समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्ह्यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून २७ प्रस्ताव दाखल झालेत. त्यापैकी संदीप पुंडलिक पाटील, पळासखेडा, जितेंद्र ईश्वर पाटील शिवरे-दिगर ता.पारोळा, ईश्वर जगन्नाथ सूरदास. मुंजलवाडी, गोकुळ जगन्नाथ चौधरी. खानापूर, वासुदेव हरी पाटील. केऱ्हाळे,ता.रावेर, नजीर पीरखा तडवी. मोंढाळे, दिलीप प्रकाश पाटील. दुसखेडा, ईश्वर विठ्ठल हिरे. खेडगाव नंदीचे, अल्लाउद्दिन सांडू तडवी. पिंप्री खु.प्र.पा.ता.पाचोरा, मगन दंगल पाटील. घुमावल ता.चोपडा, छाबिलदार शामराव कोळी. साकेगाव ता.भुसावळ, अनिता गजानन कोळी. बोरगाव, विकास भगवान नप्ते. खांडवे, आसाराम राणू जोशी. कुंभारी ता. जामनेर, प्रकाश रमेश माळी. गुढे ता.भडगाव, भूषण बालु गुंजाळ. रहीपुरी ता.चाळीसगाव आणि नंदलाल निंबा शिंपी. पष्टाणे ता.धरणगाव असे एकूण १९ प्रस्तावाना मान्यता देण्यात आली. तर ८ प्रस्ताव अपात्र असल्याच्या कारणावरून फेटाळण्यात आले. या आत्महत्याग्रस्त शेतकरी मदत समितीच्या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांचे प्रतिनिधी यांचेसह समितीचे आदी सदस्य उपस्थित होते.

Protected Content