प्रा. सतीश पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील कार्यरत हिंदी विभागाचे प्राध्यापक, प्रा. सतीश पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या वतीने डॉ. मु.ब. शहा : जीवन आणि साहित्य या विषयावर संशोधन कार्य पूर्ण करताना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

प्रा. सतीश पाटील तालुक्यातील मारवड येथील राहणार आहेत. त्यांना प्रो. जयश्री गावित, विद्यावर्धिनी सभेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. विश्वास पाटील, शहादा, डॉ. पितांबर सरोदे, नंदुरबार व प्राचार्य डॉ. कृष्णा पोतदार, धुळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूरचे अध्यक्ष आ.शिरीष चौधरी व सर्व पदाधिकारी आणि धनाची नाना महाविद्यालय, फैजपूरचे प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

 

Protected Content