डोंगरकठोरा येथील शासकीय जमिनीवर भोगवटादार लावल्याप्रकरणी ग्रामविस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखलचे आदेश

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरकठोरा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमीनीची रितसर गांवठाणची कार्यवाही न करता भोगवटादार लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी यावल येथील ग्रामविस्ताराधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी भालोद मंडळाधिकारी यांना दिले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमीन असलेल्या गावठाणाबाबत यावलचे ग्रामविस्तर अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाची रितसर परवानगी न घेतला भेगवटादार लावून गाव नमूना नंबर ८ (अ) तयार केल्याबाबत फैजपूर प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार आली होती. या तक्रारीची दखल घेत यावल ग्रामविस्तार अधिकारी यांना खुलासा सादर करण्याबाबत पहिली नोटीस बजावण्यात आली. पहिली नोटीस बजावून ४ महिन्याचा कालावधी होवूनही ग्रामविस्तार अधिकारी यांनी कोणताही लेखी खुलासा मुदतीत पाठविला नाही. त्यानंतर फैजपूर कार्यालयाने पुन्हा नोटीस बजावली होती. यात म्हटले होते की, ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जमीन असलेल्या गावठाणाची भोगवटादार लावून गाव नमूना नं ८ (अ) तयार करतांना शासकीय महसूल भरण्यात आला आहे का ?, तसेच सक्षम प्राधिकारी यांच्याकडून जागा वितरणाबाबत आदेश घेतला आहे का ? महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही व गुन्हा दाखल का करणेत येवू नये ? असे नमूद केले होते. तरी देखील यावल ग्रामविस्तार अधिकारी यांच्याकडून कोणाताही खुलासा प्राप्त झाला नाही. त्यामुळे फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी भालोदचे मंडळाधिकारी मिलींद देवरे यांना संबंधित ग्रामविस्तार अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे. या कारवाईमुळे यावल तालुक्यात व महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Protected Content