यावल येथे मोफत रोग निदान व शस्त्रक्रिया शिबीर

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य आरोग्य संस्था महाराष्ट्र शासन अंतर्गत आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येथील निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हापरिषदेचे मावळते गटनेते प्रभाकर सोनवणे व मान्यवर  यांच्यासह उपस्थित रुग्ण महिलेच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. प्रसंगी व्यासपीठावर पंचायत समितीचे मावळते काँग्रेस गटनेते शेखर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील (मुन्ना पाटील ), जिल्हा शासकीय रुग्णालयाचे नोडल ऑफिसर डॉ. पंकज पाटील, वढोदा सरपंच संदीप सोनवणे, अनिल जंजाळे, अजय बढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी.बी. बारेला, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत सरोदे, डॉ मोनिका देसाई , प्रभाकर खाचणे, सेनेचे किरण बारी आदी उपस्थित होते.

शिबीराच्या कार्यक्रमाचे प्रास्तावीक येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्दकीय अधिक्षक डॉ.बी.बी.बारेला, यांनी केले. प्रसंगी जि.प. चे मावळते शिक्षण, क्रिडा व आरोग्य सभापती रविंद्र पाटील, जि.प. चे मावळते  सदस्य प्रभाकर सोनवणे, बाजार समिती सभापती मुन्ना पाटील, पं.स.चे मावळते सदस शेखर पाटील, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, डॉ. हेमंत बऱ्हाटे यांचे समयोचित भाषणे झाले. शिबिरात २७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील २९ जणांवर विविध शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. २४ मार्चपर्यंत येथे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र तायडे यांनी केले. तर आभार नानासाहेब घोडके यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शुभम तिडके, डॉ. मोनिका देसाई, डॉ. वैशाली निकुंभ, नानासाहेब घोडके, विजय वाढेकर वसंत कुमार संदानशिव यांनी विशेष सहकार्य केले.

 

Protected Content