श्री महर्षी व्यास महाराज प्राणप्रतिष्ठान वर्धापन दिनानिमित्ताने संगीतमय कथा व महा विष्णुयाग कथेचे आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील श्री महर्षी व्यास महाराज यांच्या २३ व्या प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिना निमित्ताने संगीतमय कथा व महाविष्णुयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यावल येथील श्री महर्षी व्यास प्राणप्रतिष्ठेच्या २३ व्या वर्धापनदिनाचे निमित्ताने श्री महर्षी व्यास व श्रीराम मंदीर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांसाठी प. पु . दिदी ममता श्रीजी व्यास ,यावल ( महाराष्ट्र ) यांच्या सुमधुर वाणीतुन रविवार दि. २७ नोव्हेंबर  ते  सोमवार दि. ५ डिसेंबर २०२२पर्यंत संगीतमय श्री शिव महापुराण कथा व महाविष्णुयाग यज्ञ चे आयोजन करण्यात आले आहे.  एक सप्ताह चालणाऱ्या या कथेची वेळ रोज सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण, रविवार ४ डिसेंबर दुपारी ३ ते ८वाजेपर्यंत दिंडी सोहळा, दि. ५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ह.भ.प. जितेन्द्र महाराज ( सोयगाव ) जिल्हा औरंगाबाद यांच्या काल्यांचे किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परीसरातील भाविकांनी या संगीतमय श्री शिव महापुराण कथा व महाविष्णुयाग यज्ञाचा लाभ घ्यावा असे श्री महर्षी व्यास व श्रीराम मंदीर, संस्था यावलच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे,

 

Protected Content