Home Cities यावल जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूरमध्ये डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया सुरू ; CAP Round-II...

जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूरमध्ये डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया सुरू ; CAP Round-II साठी ऑप्शन फॉर्म भरण्यास प्रारंभ

0
2

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणासाठी ओळख असलेल्या जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे. तंत्र व वैद्यकीय शिक्षण मंडळ संचलित या नामांकित संस्थेमध्ये विविध अभियांत्रिकी शाखांसाठी प्रवेश उपलब्ध असून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (CAP Round-II) दुसऱ्या टप्प्यासाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदतही जाहीर करण्यात आली आहे.

संस्थेला तंत्रशिक्षण क्षेत्रात गुणवत्तेची प्रदीर्घ परंपरा लाभली असून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जे. टी. महाजन पॉलिटेक्निक (DTE Code: 5229) मध्ये सिव्हील इंजिनिअरिंग (कोड: 522919110), कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (कोड: 522924510), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (कोड: 522923310) आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग (कोड: 522961210) या प्रत्येक शाखेसाठी प्रत्येकी ६० प्रवेश क्षमता उपलब्ध आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (कोड: 522937010) या शाखेसाठी ३० प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा विद्यार्थ्यांनी २० ते २१ जुलै २०२६ या कालावधीत ऑप्शन फॉर्म भरावेत, तर थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी २२ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत पर्याय अर्ज सादर करावेत, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. याशिवाय संस्थास्तरावर थेट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फी सवलतीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी यासाठी विविध शासकीय शिष्यवृत्ती योजनांचा लाभही संस्थेत उपलब्ध आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJ-NT) आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १०० टक्के ट्युशन फी सवलत दिली जाते. तर इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना ५० टक्के ट्युशन फी सवलत मिळते. तसेच EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या नियमानुसार फी माफी योजना तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनांचाही लाभ उपलब्ध आहे.

महाविद्यालयात अनुभवी, उच्चशिक्षित व मान्यताप्राप्त प्राध्यापकांचा अध्यापनासाठी कार्यरत असलेला शिक्षकवर्ग, उत्कृष्ट निकालाची सातत्यपूर्ण परंपरा, अद्ययावत प्रयोगशाळा, आधुनिक कार्यशाळा, समृद्ध ग्रंथालय, ई-जर्नल्स, बुक बँक सुविधा तसेच संपूर्ण परिसरात हाय-स्पीड इंटरनेटची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. परगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र, सुरक्षित वसतिगृहाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती, मार्गदर्शन किंवा प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी ७५८८१९११५७, ८००७६४४३५०, ८६९८७०८४६१ किंवा ९४२३४८९८५६ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound