शेंदुर्णीत रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील नगरपंचायतच्या वार्ड क्रमांक ८ मधील मिल्लत नगरातील रस्ता डांबरीकरण कामाचा भुमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.

नगरपंचायतचे नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल यांचे हस्ते भाजपचे जेष्ठनेते गोविंद अग्रवाल, अमृत खलसे तसेच शिवसेनेचे स्थानिक नेते विरेंद्र पाटील, विलास बारी, बारकू जाधव, अशोक बारी, रमेश भोसले, सिदेश्वर पाटील, राजू पाटील, संतोष माळी, विनोद नाईक व शिवसेना शहर अध्यक्ष संजय सुर्यवंशी युवासेना अध्यक्ष अजय भोई या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी भाजप जेष्ठनेते गोविंद अग्रवाल, अमृत खलसे व पदाधिकाऱ्यांचा शेंदूर्णी शहर शिवसेनेचे वतीने सुनील गुजर, संजय सूर्यवंशी, अजय भोई, विलास बारी हस्ते शिवसेनेचा भगवा रुमाल घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी वार्ड नगरसेविका पती फारूक खाटीक, सत्तार कुरेशी, युनूस कुरेशी, इकबाल कुरेशी, जाबिर कुरेशी, बशीर खाटीक, निसार पैलवान, अकिल खाटीक यांची उपस्थिती होती. शेंदूर्णी गावाच्या विकासासाठी शिवसेने कडून पुढाकार घेण्यात आला असून येथिल नगरपंचायतसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्फत मोठा निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक शिवसेना पदाधिकारी प्रयत्नशील असून निधी उपलब्ध होताच नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे शिवसैनिकांच्या चर्चेतून समजते.

शेंदूर्णी शहर विकासासाठी भाजप सेनेच्या नेत्यांनी एकत्र येऊन केलेल्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून स्थानिक शिवसेने पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे शहर विकासात गती येणार असून लवकरच ५० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनाही मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहेत. भूमिपूजन सोहळ्यातील शिवसैनिकांची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गुजर यांनी केले तर आभार विनोद नाईक यांनी केले.

 

Protected Content