ग.स.च्या सभेत गदारोळ : वार्तांकन करणाऱ्या पत्रकारास अरेरावी (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 06 23 at 3.45.06 PM

जळगाव (प्रतिनिधी) शहरात आज झालेल्या ग.स. सोसायटीच्या सभेत ज्येष्ठ सदस्यांच्या सत्कारावरून वाद निर्माण झाला असता, त्या वादाचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारास अरेरावी करून त्याचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रकार घडला. यावेळी बराच गोंधळ होवून अनेकांनी मध्यस्थी केल्यानंतर मोबाईल परत देण्यात आला.

अधिक माहिती अशी की, आज सकाळी ग.स. सोसायटीची सभा सुरु झाल्यानंतर ज्येष्ठ सदस्य आणि गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्याच्या कार्यक्रमात सत्कार समारंभ सुरु होताच काही सदस्यांनी आधी सकाळी लवकर आलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करा, असा आग्रह धरुन व्यासपीठाजवळ गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सभेचे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने या घटनेचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केल्यानंतर काहींनी त्यांना अरेरावी केली. इथे इतर चांगले होत आहे, ते दिसत नाही का ? असे म्हणत एका तरुणाने त्यांचा मोबाईल काढून घेतला. यानंतर व्हॉट्सअपमधून व्हिडिओ डिलीट करून मोबाईल स्वतःजवळ घेऊन तो तरुण तेथून निघून गेला. यावेळी पत्रकारांनी ग.स. अध्यक्ष मनोज पाटील यांची व्यासपीठावर जाऊन भेट घेत झालेला प्रकार लक्षात आणून दिला. यावेळी विलास नेरकर यांनी मध्यस्थी करत मोबाईल परत केला. तू कोणत्या गटाचा आहेस ? असा प्रश्न उपस्थित करत तुला येथे कोणी बोलवले आहे ? अशाप्रकारच्या प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर केला. हा गोंधळ बघून त्यांना ओळखणारे काही पत्रकार व अन्य मंडळीनी मध्यस्थी करून त्यांचा मोबाईल परत करायला लावला.

 

Protected Content