जिल्ह्यातील २८.३ नागरिकांमध्ये आढळल्या कोविडच्या अँटीबॉडीज !

जळगाव प्रतिनिधी । भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआरने केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील २८.३ टक्के लोकांच्या शरीरात कोविडच्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. हे प्रमाण आरोग्य कर्मचार्‍यांपेक्षा जास्त असल्याची बाब लक्षणीय आहे.

आयसीएमआर या संस्थेने अलीकडेच देशात कोविड-१९ या विषाणूबाबत सिरो सर्व्हे केला होता. यामध्ये महाराष्ट्रातील जळगावसह बीड, परभणी, नांदेड, सांगली आणि नगर या जिल्ह्यांचा समावेश होता. याबाबतचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य ४२७ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. या सेरा सँपल्स पैकी १२१ नागरिकांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. अर्थात, या सर्वांच्या शरिरात कोरोनाच्या अँटीबॉडीज असल्याचे निष्पन्न झाले आहे. एकूण चाचण्यांचा विचार केला असता हे प्रमाणे २८.३ टक्के इतके आहे. 

दरम्यान, यासोबत आरोग्य क्षेत्रातील १०३ कर्मचार्‍यांच्या सँपल्सची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २३ जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. हे प्रमाण २२.३ टक्के इतके आहे. अर्थात, आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधील अँटीबॉडीजचे प्रमाण हे जास्त असल्याचे या तपासणीतून दिसून आले आहे. याबाबत आयसीएमआरचे सचिव डॉ. बलराम भार्गव यांनी पत्र जारी करून ही माहिती दिली आहे.

Protected Content