अ. भा. लेवा विकास महासंघ विद्यार्थी संघटनेतर्फे फी वाढीच्या विरोधात निवेदन

जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, विद्यार्थी संघटनेच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतनातील वाढलेली फी रद्द करावी आणि प्रवेश प्रक्रियेबाबतचा संभ्रम दूर करावा या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकार्‍यांना दिले.

याबाबत वृत्त असे की, अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, विद्यार्थी संघटनेतर्फे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय,जळगाव येथील वाढलेली फी व प्रवेश प्रक्रियेसाठी असलेला कालावधी कमी असल्या कारणाने जळगाव जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले. मागील वर्षाची फी १५६१ होती आणि या वर्षी ४५५० केली. ही फी वाढ रद्द करावी. तसेच अर्ध्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबद्दल सुद्धा माहिती नसल्याने विद्यार्थी संभ्रमात असून हा संभ्रम दूर करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष विष्णुभाऊ भंगाळे यांच्या नेतृत्वखाली जळगाव शहर सचिव सिद्धार्थ कोलते, प्रतीक भंगाळे, चिन्मय फेगडे, गुंजन पाटील, प्रणव कुरकुरे यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना या बाबतचे निवेदन दिले. प्रशासनाने विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवावेत, कोरोनासारख्या महामारी मध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व सर्व विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू असे जिल्हाध्यक्ष हर्षल बोरोले यांनी संगीतले.

Protected Content