लॉकडाऊनमध्ये लोहमार्ग पोलीस स्थानकात ‘बर्थ डे सेलीब्रेशन’ !

भुसावळ प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनमध्ये पोलीस प्रशासनासह विविध शासकीय कर्मचारी अहोरात्र परिश्रम करत असतांना येथील लोहमार्ग पोलीस स्थानकात साजरा केलेला बर्थ डे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोना संसर्गजन्य विषाणूंनी थैमान घातले आहे. याचा प्रतिकार करण्यासाठी डॉक्टर,नर्स,पोलीस कर्मचारी,सफाई कर्मचारी दिवस-रात्र लढत आहे.तर भुसावळ येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात एका कर्मचार्‍याचा वाढदिवस नुकताच मोठ्या थाटात साजरा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या या कार्यक्रमाची छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

याठिकाणी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षकांसह ४३ कर्मचार्‍यांनी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवत शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत वाढदिवसाचा आनंद लुटला. तर याच दरम्यान रात्री ७:०० वाजेला प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ वर येणार अपच्या पवन एक्सप्रेस मधून स्वामी समर्थ मंदिरा जवळील आउटर वरून दोन मोबाईल बळजबरीने हिसकविण्यात आले हे विशेष. कोरोना संसर्गजन्य विषाणूंमुळे सरकारने कलम १४४ लागू केले आहे.तर दुसरीकडे कायदेचे पुजारीच कायद्याचे उल्लंघन करीत आहे.सामान्य नागरिक रेल्वे स्टेशन परिसरात फिरतांना दिसला तर त्या नागरिकांवर कारवाई केली जाते.हे नियम सामान्यासाठी लागू आहे मग पोलीस कर्मचार्‍यांना लागू नाही का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.

Protected Content