भाजपातर्फे पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्ताने लसीकरण शिबिराचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि. १७ सप्टेंबर रोजी भाजपा जळगाव जिल्हा व महानगरतर्फे भव्य कोरोना लसीकरण शिबिराचे  करण्यात आले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ वाढदिवस भव्य कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन सकाळी  ९ ते  दुपारी ५ वाजेपर्यंत  सरदार ववल्लभभाई पटेल भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोर येथे करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे  तसेज भाजपा महानगरातील मंडल अध्यक्ष, नगसेवक, आघाडीचे अध्यक्ष, व कार्यकर्ते ,यांनी आप आपल्या, मंडलातील, प्रभागातील  नागरिकांना या लसीकरणाचा लाभ मिळुन द्यावा अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.  जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशीं ,नितीन इंगळे, जिल्हा प्रसिध्दी  मनोज भांडारकर यांनी कळविले आहे

Protected Content