रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हास्तरीय बैठक आज पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या अध्यक्षस्थानी  आयोजित करण्यात आली होती.

 

बैठकीत येत्या २२  ऑक्टोंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा जळगाव जिल्हा दौरा असून त्या अनुषंगाने तसेच पक्षात सभासद मोहीम गाव तिथे शाखा, जिल्हा बॅक निवडणूकीत आरपीआयला अनुसूचित जाति जनजातिमधून जागा द्यावी विषयी चर्चा करण्यात आली. दरम्यान, आरपीआय आठवले गट हा भाजपाचा मित्र पक्ष असल्याने भाजपकडे जिल्हा बँक निवडणुकीत अनुसूचित जाति जनजातीसाठी राखीव असणारी जागा द्यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

यावेळी खान्देश अध्यक्ष लक्ष्मण जाधव,  जळगाव लोकसभा क्षेत्र अध्यक्ष आनंद खरात, युवक जिल्हाअध्यक्ष भगवान सोनवणे, युवक जिल्हा अध्यक्ष रवींद्र सपकाळे, जिल्हा सचिव भरत मोरे, जिल्हा बैठकीचे नियोजन महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल  यांनी केले होते. यावेळी भडगाव तालुका अण्णा खेडकर, एरंडोल तालुका प्रविण बाविस्कर, आयटी  सेलचे अध्यक्ष मिलिंद तायडे, यावलचे अशोक तायडे पारधे, रावेर युवराज सोनवणे, पारोळा अध्यक्ष अशोक कापडणे, चोपडा तालुका अध्यक्ष भिवराज रायसिंगे, युवकचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, तन्वीर शेख यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसगी महानगरअध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील युवकांनी पक्षात प्रवेश केला.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/224363853040582

 

Protected Content