पहिली कसोटी : रोहित पाठोपाठ मयंकचेही शतक

Mayank Agarwal

विशाखापट्टणम वृत्तसंस्था । दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणम येथे कालपासून सुरू झालेल्या सामन्यात भारताच्या सलामीच्या जोडीने तळ ठोकला आहे. रोहित शर्माने काल कसोटी कारकिर्दीतले चौथे शतक ठोकल्यानंतर आज मयांक अग्रवालने त्यावर कळस चढवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचं हे पहिलंच शतक आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताच्या तोफा धडाडल्या आहेत. ‘हिटमॅन’ रोहित शर्मानंतर दुसरा सलामीवीर मयांक अग्रवाल यानेही खणखणीत शतक झळकावले आहे. कालच्या ८४ धावांवरून पुढे खेळताना त्याने शतकी टप्पा सहज पार केला. या दोघांच्या शतकी कामगिरीच्या जोरावर भारताची धावसंख्या ३०० च्या जवळ पोहोचली आहे.

मयाकनं २०१८-१९ मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेपासून कसोटी पदार्पण केले ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग अर्धशतकं ठोकून त्याने आपले स्थान पक्के केले आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतही मयांकने ५० हून अधिक धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, अर्धशतकाचे शतकामध्ये रूपांतर करण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल क्रिकेटचे जाणकार शंका व्यक्त करत होते. या सर्व शंकाकुशंकांना मयांकने आज आपल्या खेळीतून सर्वांना उत्तर दिले. कसोटी शतक झळकावणारा तो ८६ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचे हे शतक भारताचे ५१० वे कसोटी शतक ठरले आहे. लोकेश राहुल व मुरली विजय हे दोघेही सलामीवीर म्हणून अपयशी ठरल्याने मयांक अग्रवालला संधी देण्यात आली होती.

Protected Content