अमळनेर येथे ‘खानदेशी बोली साहित्य संमेलनाचे’ आयोजन

ashok koli

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत पूज्य साने गुरूजी ग्रंथालय व वाचनालयच्या वतीने अमळनेर येथे येत्या दि.२३ व २४ नोव्हेंबर रोजी ‘खानदेशी बोली साहित्य संमेलनाचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी खानदेशातील प्रसिद्ध कादंबरीकार व बोली अभ्यासक डॉ.अशोक कौतिक कोळी यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. कोळी हे खानदेशी ‘तावडी बोली’चे विशेष अभ्यासक आहेत. तसेच मराठी ग्रामीण साहित्यातील त्यांचे स्थान अबाधित आहे. विशेषतः नव्वदोत्तरी मराठी ग्रामीण साहित्यातील हे ठळक नाव आहे. जागतिकीकरणानंतरचे बदलचे ग्रामवास्ताव त्यांनी जोरकसपनाने आपल्या कथा- कादंबऱ्यामधून मांडले आहे. त्यांची ‘कूड,’ ‘सूड,’ ‘आसूड’, ‘उलंगवाडी’ हे कथासंग्रह तर ‘पाडा’, ‘कुंधा’, ‘दप्तर’, ‘रक्ताळलेल्या तुरी,’ ‘गावाच्या तावडीतून सुटका’ ह्या कादंबऱ्या, ‘माझ्या गावाला जाऊ,’ ‘वाघूरचं पाणी,’ ‘गावाकडल्या कविता’ हे कवितासंग्रह अशी साहित्य संपदा प्रकाशित आहे. त्यांच्या अनेक कथा- कवितांचा विविध अभ्यासक्रमात सहभाग झालेला असून त्यांच्या साहित्यावर विविध विद्यापीठात संशोधन झालेले आहे व सुरू आहे. तसेच अशोक कोळी हे राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने सान्मानित आहेत. सोबतच त्यांच्या साहित्य कृतींना महाराष्ट्र शासनाचे उकृष्ट वाडःमय पुरस्कार दोन वेळा आणि इतरही वाडःमयीन संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

कोळी यांचे लेखन हे खास ‘खानदेशी तावडी’ बोलीतून झालेले असून आपल्या अभ्यासातू, लेखनातून त्यांनी ह्या बोलीला सर्वदूर पोहचविले असून मराठी साहित्यात मानाचे पान मिळवून दिले आहे. याच बोलीचा सविस्तर परिचय करून देणारा ‘तावडी बोली’हा अभ्यासपूर्ण ग्रंथ सिद्ध केलेला आहे. गेल्याच वर्षी जामनेर येथे संपन्न झालेल्या ‘पहिल्या तावडी बोली साहित्य संमेलनाच्या’ आयोजनात त्यांची महत्त्वाची भुमिका राहिली आहे.

Protected Content