राज्यात नवीन मोटार वाहन कायद्याला स्थगिती

मुंबई प्रतिनिधी । राज्यात नवीन वाहन कायदा लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचा निर्णय आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केला.

दिवाकर रावते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवीन कायदा लागू करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, या कायद्याला स्थगिती देण्यात आली असून या कायद्याबाबत राज्य सरकारसोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहितीसुध्दा त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्यामुळे देशभरात प्रचंड रोष पसरला आहे. यातच आगामी निवडणुकीआधी याला लागू करणे हे नव्या वादाला निमंत्रण देणारे ठरू शकते ही बाब लक्षात घेऊनच याला स्थगिती देण्यात आल्याचे मानले जात आहे.

Protected Content