Home Cities जळगाव जळगावात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

जळगावात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

0
101

raver 1

रावेर प्रतिनिधी । आदिल शाह फारूकी बहुउद्देश्यीय संस्थेतर्फे दि.12 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन जळगाव येथील अल्पबचत भवन येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि.प. अध्यक्षा उज्वला पाटिल उपस्थितीत होत्या. कार्यक्रमाची सुरुवातीला दीपप्रज्वलन हक़ीम आर चौधरी मु. नगर व फारूक शेख जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रावेर तालुक्यातील राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. याचबरोबर 38 मान्यवरांना देखील पुरस्करा देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी हक़ीम चौधरी, गनी मेमन, फारूक शेख, आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जावेद शेख याकूब, अय्यूब शेख, शेख अल्ताफ, जावेद शाह, जुबेर शाह यांच्या आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अली अंजुम रिज़वी जळगाव यांनी केले तर प्रथम सूत्रसंचालन सुरेश बोरसे यांनी केले. प्रस्ताविक व आभार संस्था अध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी मानले.


Protected Content

Play sound