आता तरी परिक्षेचा आग्रह सोडा- उदय सामंत

मुंबई प्रतिनिधी । राजभवन आणि जलसा सारख्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचल्याने आता तरी परिक्षेचा आग्रह सोडण्याची मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

केंद्र सरकारने महाविद्यालयाच्या परिक्षेची तयारी सुरू केली असली तरी राज्य सरकारने याला विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमिवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पुन्हा परिक्षेला विरोध केला आहे.राजभवनामधील १८ कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर उदय सामंत यांनी यावरुनच परीक्षा घेणं किती धोकादायक आहे हे दिसून येत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट करताना राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अशा सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला. आता तरी एचआरडी आणि युजीसीला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे. आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का?, असे प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

याआधी उदय सामंत यांनी राजभवनामध्ये १८ कर्मचारी करोना पॉझिटीव्ह सापडल्यामुळे राज्यापालांनाही तब्बेतीची काळजी घ्यावी असं ट्विट केलं होतं. राजभवनातील कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळते आहे. माननीय महामहिम राज्यपाल महोदयांनी देखील स्वतःच्या तब्बेतीची देखील काळजी घ्यावी, असं ट्विट सामंत यांनी केलं होते. राज्य सरकारने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांबरोबरच कोणत्याही परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतलेला असतानाच विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील भूमिका घेतल्याने यावरुन वाद सुरु आहेत. याच पार्श्‍वभूमीवर सामंतांनी आज परिक्षेला पुन्हा विरोध केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Protected Content