राजभवन सुरक्षित नसतांना विद्यार्थी सुरक्षित कसे ? : जिल्हाध्यक्ष मराठे यांचा ट्विटरद्वारे सवाल

जळगाव, प्रतिनिधी ।  महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत अंतिम परीक्षा घेण्यावरून वाद निर्माण झाला होता. राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम आहे. आता राजभवनात १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी चिंता व्यक्त करत भाजपला टोला लगावला आहे.

जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी ट्विट करुन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना थेट काही प्रश्न विचारले’ राजभवनात कोरोना पोहोचला आहे. अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहोचू शकला. आता तरी HRD आणि UGC ला पटेल का? की परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे’, असा सवाल मराठे यांनी उपस्थितीत केला आहे. तसंच, ‘कोरोनाची ही परिस्थिती पाहता आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का?’ असा थेट सवाल मराठे यांनी उपस्थितीत केला आहे. राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण, त्यांच्या या निर्णयाला भाजपने विरोध केला होता. एवढंच नाहीतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर यूजीसीने विद्यापीठांना अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. परंतु, उदय सामंत यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्दच असणार, असं स्पष्ट केलं. त्यानंतर आता  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राजभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. यात सर्वात आधी एक वायरमन कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याची सर्वात आधी चाचणी करण्यात आली होती. अद्याप ४५ लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट येणे बाकी आहे.तर दुसरीकडे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. खबरदारी म्हणून राज्यपाल स्वत: क्वारंटाईन राहत आहे. इतके सुरक्षित राजभवन व राज्यपाल कोरोनाच्या विळख्यात येऊ शकतात तर मग परीक्षा घेतल्या तर महाविद्यालयाच्या सुरक्षिततेचे काय..? यासारखे थेट सवाल जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी उपस्थित केले. तसेच राज्यपाल यांनी आतातरी महाराष्ट्र राज्यामधील कोरोनाची खरी अती गंभीर परिस्थितीचा आढावा केंद्र सरकार व युजीसीकडे सकारात्मकरीत्या मांडावा व परीक्षा घेणे महाराष्ट्र राज्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्य नाही व त्या रद्दच करण्यात याव्या या प्रकारची मागणी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष मराठे यांनी केले आहे.

Protected Content