फैजपूरला भाजपाचा विजयोत्सव साजरा

फैजपूर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब गोवा मणिपूर या पाच राज्यातील झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयी घोडदौड निकाला बद्दल फैजपूर भारतीय जनता पार्टी तर्फे खंडोबा मंदिर महाद्वार छत्रपती शिवाजी महाराज चौकात आतीषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

 

देशातील पाच राज्यांच्या विधानसभां निवडणुकीत देशप्रेमी नागरिकांनी भारतीय जनता पार्टी ला दिलेले भरघोस मतदान मुळे भाजपाची विजयी घौडदौड म्हणजे देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी च्या नेतृत्वाखाली भारत बलशाली होवून व केलेल्या विकास कामांना मतदारांनी विजय कौल दिल्याची प्रतिक्रिया सरचिटणीस संजय सराफ यांनी याप्रसंगी दिली. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, ओबीसी प्रदेश सचिव भरत महाजन , माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, विकास सोसायटी चेअरमन राजेश महाजन, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष वैभव वकारे, प्रतीक वारके, महिला शाखाध्यक्ष जयश्री चौधरी, ओबीसी शाखाध्यक्ष अनुराधा परदेशी, वसंत परदेशी, दीक्षा पाटील, नरेंद्र चौधरी, रवींद्र सरोदे, रवींद्र होले, किरण चौधरी, रामा होले, मनोज सराफ, जितेंद्र वर्मा, संजय भावसार, अक्षय परदेशी यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व भाजपा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने विजय उत्सवात सहभागी झाले होते.

Protected Content