Home धर्म-समाज यावल तालुका कुंभार समाज संस्थेच्या अध्यक्षपदी विजय पंडीत यांची निवड

यावल तालुका कुंभार समाज संस्थेच्या अध्यक्षपदी विजय पंडीत यांची निवड

0
6


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कुंभार समाजातील युवा सामाजिक कार्यकर्ते विजय देविदास पंडीत यांची कुंभार समाज सामाजिक संस्था, जळगावच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, समाजहिताच्या विविध उपक्रमांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा येथील समाज मंदिरात कुंभार समाज सामाजिक संस्थेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संस्थेचे जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे, सचिव सखाराम मोरे, उपाध्यक्ष सुभाष पंडित यांच्यासह संस्थेचे प्रमुख पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

बैठकीदरम्यान कुंभार समाज सामाजिक संस्थेला अधिक बळकटी देणे, समाजातील विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे तसेच समाजातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली. याच अनुषंगाने विजय देविदास पंडीत यांच्यावर यावल तालुक्याची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांनी विजय पंडीत यांना निवडीचे पत्र देत यावल तालुका अध्यक्षपदाची अधिकृत जबाबदारी सोपविली. समाजाच्या संघटनात्मक बांधणीसह समाजहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय योगदान द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

विजय पंडीत हे युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असून, त्यांच्या निवडीचे यावल तालुक्यासह जिल्ह्यातील समाजबांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे. आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासह विविध मान्यवर आणि समाजबांधवांनी विजय पंडीत यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विजय पंडीत यांच्या निवडीमुळे यावल तालुक्यात कुंभार समाजाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा असून, समाजाच्या विविध प्रश्नांसाठी ते पुढाकार घेतील, असा विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला.

 


Protected Content

Play sound