कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

मुंबई- संसदेने पारित केलेल्या कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे.

या भेटीत पृथ्वीराज चव्हाणांनीकेंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकरीविरोधी असून सरकारने याला स्थगिती द्यावी अशी मागणी राज्यपालांकडे केली.

कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसनं देशव्यापी आंदोलन छेडलं आहे, त्यासाठी प्राथमिक स्वरुपात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली, घाईगडबडीने संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं, २५० शेतकरी संघटनांनी या विधेयकाला विरोध केला आहे. शेतकऱ्यांशी चर्चा न करता सरकारने भांडवलदारांना पुरक विधेयक आणली, सरकारने तात्काळ यावर स्थगिती देऊन पुन्हा विधेयकावर चर्चा करावी असं त्यांनी सांगितले.

संसदेत चर्चा करुन विधेयक आणायला हवं होतं, परंतु विरोधकांना चर्चा करण्याची वेळच दिली नाही. सरकारने विधेयकं तात्पुरतं स्थगित करुन त्यावर चर्चा घडवून आणावी. राज्यात तिन्ही पक्षाचं सरकार आहे, या विधेयकाबाबत चर्चा करुन मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होईल अशी माहितीही पृथ्वीराज चव्हाणांनी दिली.

Protected Content